Panjabrao Dakh letest Havaman Andaj :- पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जारी..! पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस..!

Panjabrao Dakh letest Havaman Andaj: शेतकरी मित्रांनो राम राम..! महाराष्ट्रात भर मे महिन्यात देखील अवकाळी पावसाने थैमान घातले आहे, आणि अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाचा नवीन अंदाज जाहीर केला असून त्यांनी पुन्हा अवकाळीचा इशारा देत शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे..

पंजाबराव डख यांनी सांगितल्या प्रमाणे राज्यात ८ आणि ९ मे रोजी पश्चिम महाराष्ट्र,, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र मध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या काळात कांदा उत्पादक/आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी जास्त काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच शेतीतील कामे उरकून घेण्याचा सल्ला पंजाबराव यांनी दिला आहे.

या दिवशी राहणार उघडीप

राज्यात १० मे पासून १६ मे पर्यंत हवामान पूर्णतः कोरडे राहील. या काळात राज्यात पाऊस पडणार नाही. मात्र, पुन्हा १७, १८ व १९ मे रोजी पुन्हा पाऊस हजेरी लावणार असून या काळात पाऊस हा ठिकाण बदलून बदलून पडणार आहे. बरोबरच कोकण पट्टीच्या भागात गारपीठ होण्याची शक्यता देखील आहे. या तीन दिवसांच्या काळात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाबरोबरच विज पडण्याची देखील शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव प्राण्यांना उघड्या जागेवर बांधू नये तसेच कोणीही झाडाखाली थांबू नये.

पंजाबराव डख आहेत तरी कोण ? त्यांचा हवामान अंदाज खरा ठरतो तरी कसा..?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पंजाबराव डख हे मूळचे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मौजे गुगळी धामणगाव येथे वास्तव्यास आहे, ते एक शेतकरी असून त्यांना टीव्हीवर नियमित हवामान विषयक माहिती पाहण्याची सवय होती. टिव्हीवर हवामान अंदाज पाहिल्यानंतर पंजाबराव डख हे त्यांच्या वडिलांबरोबर पावसाच्या अंदाजावर सातत्याने चर्चा तसेच निरीक्षण करत असायचे आणि आपल्या त्यांनी केलेल्या निरीक्षणांची नोंद त्याच्या वहीत करत असायचे. कालांतराने पंजाबराव डख यांना निसर्गाच्या संकेतावरून तसेच संगणकाचा,, उपग्रहांचा,, नकाशांचा वापर करून पंजाबराव निरीक्षणाची नोंद करू लागले. हवामान अंदाजाच्या कुतूहलापोटी त्यांनी सी-डॅक कोर्स देखील केला आहे. बऱ्याचदा त्यांनी केलेले निरीक्षण हे तंतोतंत बरोबर ठरायचे आणि त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अचूक पावसाचा अचूक अंदाज मिळत असल्याने त्यांचे नुकसान हे कमी प्रमाणात व्हायचे एकूणच काय तर त्यांच्या अंदाजाने शेतकऱ्यांना मदत मिळायची. हळूहळू त्यांच्या तंतोतंत हवामान अंदाजाचे ढग संपूर्ण महाराष्ट्रात घोंगावू लागले. डख साहेब मागील 26 वर्षापासून हवामानाचा तंतोतंत अंदाज वर्तवत आहेत. आजच्या घडीला पंजाबरावांचा हवामान अंदाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत असून शेतकरी मित्रांना याचा खूप मोठा फायदा होत असल्याचा दावा शेतकरी करत आहेत.

पंजाबराव डख यांचे शिक्षण?

पंजाबराव जिल्हा परिषद शाळेवर सध्या अंशकालीन शिक्षक म्हणून रुजू असून त्यांचे शिक्षण हे ETD आणि CTC झाले आहे.

पंजाबराव डख यांची निरीक्षण पद्धत..?

डख साहेब हवामान अंदाज घेण्यासाठी संगणकाचा वापर करतात. शिवाय उपग्रह नकाशांचा अभ्यास आणि निरीक्षणांची नोंद करून त्यांचा अंदाज व्यक्त करतात.

Similar Posts