पंजाबराव डख अंदाज: 25 जून पासून राज्यात मान्सून सक्रिय होणार..

पंजाबराव डख यांच्या मते २५ जून २०२३ ते १५ जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस हा चांगल्या प्रकारे होणार आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. राज्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक आणि शेतकरी पंजाबराव डख यांच्या ताज्या अंदाजानुसार राज्यात 25 जून पासून पावसाला सुरुवात होणार असून 25 जून ते 15 जुलै पर्यत राज्यात भाग बदलत चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत पंजाबराव यांनी वर्तविले आहे. 16 जून ते 22 जून दरम्यान राज्यात फक्त वारे वाहतील आणि 25 जूनपासून राज्यात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होणार असल्याचे असे पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे.

१६ जून रोजी पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज जारी करत म्हटले की राज्यात २५ जून पासून मान्सूनची गती हि तीव्र होणार तसेच २६ जून, २७ जून, २८ जून रोजी महाराष्ट्रात विविध भागात पेरणी इतका पाऊस होणार आहे. १० जुलैते १५ जुलै २०२३ पर्यंत उर्वरित शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होणार आहे. यावर्षी सुद्धा पाऊस वेळेवरच पडणार होता मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे व बिपरजॉय या चक्रीवादळाची गती वाढल्याने महाराष्ट्रातील सर्व बाष्पभवन वाहून नेले यामुळे या काळात महाराष्ट्रात फक्त जोरदार वारे वाहले.

बिपरजोय चक्रीवादळामुळे पंजाबराव डख यांचा पहिला अंदाज चुकीचा ठरला असून मान्सून केरळमध्ये 8 जूनला आणि 11 जूनला महाराष्ट्रात दाखल झाला होता मात्र चक्रीवादळामुळे तो संपूर्ण राज्यात पसरला नाही. तो फक्त पुणे, मुंबई, नाशिक या जिल्हापुरताच मर्यादित राहिला होता. पण आता शेतकर्‍यांनी काळजी करण्याची गरज नाही.

यंदा दुष्काळ नाहीच
यावर्षी बिपरजॉय या चक्रीवादळामुळे पाऊस वेळेवर न पडल्याने शेतकर्‍यांना वाटत आहे की यावर्षी दुष्काळ पडेल पण असे काही होणार नाही. यावर्षी जुलै मध्ये चांगला पाऊस पडणार आहे. राज्यातील शेतकर्‍यांच्या पेरण्या 15 जुलै 2023 पर्यत होण्याचा अंदाज पंजाबरावांनी वर्तविला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळ पडणार नाही शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये. 25 जूनपासून पावसाला सुरुवात होईल तर 26, 27, 28 जुनला भाग बदलत मुसळधार पाऊस पडेल.

पहा व्हिडिओ..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Similar Posts