अखेर तलाठी भरतीला मुहूर्त मिळाला; ४ हजार ६४४ जागांसाठी ऑनलाइन परीक्षा, कामांचा खोळंबा थांबणार..

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महसूल विभागातील रिक्त तलाठीच्या भरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून, महसूल व वन विभागाने ४ हजार ६४४ जागांसाठीची जाहिरात प्रकाशित केली असून या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे.

या तलाठी भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्याची मुदत २६ जून २०३३ ते १७ जुलै २०२३ पर्यंतच आहे. परीक्षेची तारीख व कालावधी ही सविस्तर माहिती https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर नंतर जाहीर जाणार असून, उमेदवारांना तो प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येणार आहे. तलाठी भरतीची ही ऑनलाइन परीक्षा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

ऑनलाइन परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १ हजार , तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये परीक्षा फी म्हणून आकारण्यात येणार आहे. कॉम्प्युटर वर होणारी ही परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका ह्या स्वतंत्ररित्या उपलब्ध केल्या जाणार आहेत.

सरकारने या आगोदर वारंवार तलाठी भरतीची घोषणा केली होती. मात्र, या तलाठी भरतीला मुहूर्तच मिळत नव्हता. तलाठी भरती रखडल्यामुले भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी होती, तर दुसरीकडे तलाठ्यांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी संबंधित कामांचा खोळंबा होत होता.

जिल्ह्यांनुसार रिक्त पदे…
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • पदाचे नाव – तलाठी
  • पद संख्या – ४ हजार ६४४
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारांनी मूळ जाहिरात पहावी)
  • परीक्षा शुल्क
    • खुला प्रवर्ग रु. १०००/- –
    • राखीव प्रवर्ग : ९००/-
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक २६ जून २०२३ पासून सुरु होईल)
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – १७ जुलै २०२३
  • अधिकृत संकेतस्थळhttps://mahabhumi.gov.in

अर्ज कसा करावा?

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे.
  • अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
  • अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल
  • सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित राहावे.

मूळ जाहिरात पाहा

Similar Posts