अखेर बदलले ‘आदिपुरुष’ मधील ‘ते’ वादग्रस्त संवाद; आता चित्रपटात मारुतीराया बोलणार…
‘आदिपुरुष’ हा चित्रपट दिनांक १६ जून २०२३ ला जग भराच्या चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडला असला, तरीही यामधील काही संवाद व दृश्यांबद्दल सोशल मीडियावर अजूनही गदारोळ सुरुच आहे. अभिनेते अरुण गोविल आणि मुकेश खन्ना अशा दिग्गज अभिनेत्यांनी दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर प्रश्न उपस्थित केले…