छ. संभाजीनगर जिल्ह्यात वाळू डेपोच्या निवीदेच्या प्रक्रियेला सुरूवात, 8 तारखेला ओपन होणार टेंडर, कशी राहील प्रक्रीया? जाणून घ्या…

छ. संभाजीनगर जिल्ह्यात वाळु डेपोच्या निवीदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून ८ तारखेला या निवीदा उघडण्यात येणार असल्यामुळे पुढील आठवड्यात वाळुच्या टेंडर प्रक्रिया पुर्ण झाल्यावर मे महिन्यातच वाळुच्या डेपोच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याकरिता गौणखनिज विभागाच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. छ. संभाजीनगर जिल्ह्यात ७ ठिकाणी हे वाळूचे डेपो होणार आहेत.

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक तालुक्यात वेग-वेगळे वाळुचे डेपो तयार करण्यात येणार आहेत. या डेपोच्या माध्यमातून नागरिकांना वाळुचा पुरवठा करण्यात येणार असून सध्या वाळुचे लिलाव बंद असल्यामुळे नागरिकांना बांधकामासाठी महागड्या दरात वाळुची खरेदी करावी लागत आहे.

टेंडर भरणाऱ्याला १० जूनपुर्वीच वाळुचा उपसा करने बंधनकारक..
आपल्या देशात १० जुन ते ३० सप्टेंबर हा कालावधी पावसाळ्याचा असतो. या पावसाळ्याच्या कालावधीत वाळु उपसा करण्याला परवानगी नसते. त्यामुळे या कालावधी पूर्वीच वाळुच्या उपसा करण्याच्या सुचना निवीदा धारकाला देण्यात येणार असल्यामुळे टेंडर निघाल्यावर ज्याला टेंडर मिळेल त्याला तातडीने डेपो सुरु करण्याकरिता लगेच वाळु उपसा करुन वाळु डेपो सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

टेंडर भरणाऱ्यासाठी अटी व शर्ती..
निविदा प्रक्रिये संदर्भात जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी माहिती देतांना सांगितले की, या प्रक्रियेमध्ये २८ तारखेला निवीदा प्रसिद्ध करण्यात आली आहे, तर ५ तारखेला दुपारी ३ वाजेपर्यत निवीदा भरण्यासाठी अंतिम वेळ असणार आहे. आणि ८ तारखेला दुपारी ३ वाजता निवीदा उघडण्यात येणार असून निवीदा भरणाऱ्याला १० लाख रुपये अनामत रक्कम म्हणून भरावे लागणार आहे. याशिवाय निवीदा भरणाऱ्याने आर्थिक वर्षात २५ लाख रुपयांचा व्यवहार केलेला असणे आवश्यक असून गेल्या तीन वर्षातले आर्थीक विवरण पत्र तसेच जीएसटी रजीस्ट्रेशन केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे

Similar Posts