मोठी बातमी! 500 रुपयांच्या नोटाही बंद होणार? RBI ने दिले स्पष्टीकरण..

RBI on scrapping Rs 500 notes : 500/1000 रुपयांच्या नोटांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने महत्वपूर्ण माहिती दिली आहे. सध्या चलनात असलेल्या 500 रुपयांच्या नोटा काढून टाकण्याचा आरबीआयचा कोणताही विचार नसल्याचे RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले या बरोबरच एक हजार रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा कसलाही विचार नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले असून यावर नागरिकांनी कोणतेही नवे अंदाज बांधु नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

500 रुपयांच्या नोटा देखील बंद होणार का?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या असून 30 सप्टेंबर 2023पर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर 500 रुपयांच्या नोटा देखील चलनातून बाद होणार असल्याच्या व 1000 रुपयांच्या बंद झालेल्या नोटा पुन्हा बाजारात येणार अश्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या.

यावर काय म्हणाले RBI गव्हर्नर?

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यावर स्पष्टिकरण देताना सांगितले की, 500 रुपयांच्या नोटा काढून टाकण्याचा अथवा 1000 रुपयांच्या नव्या नोटा परत चलनात आणण्याचा कसलाही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या बरोबरच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन सुध्दा त्यांनी केले.

यावेळी गवर्नर शक्तिकांत दास यांनी 2000 रुपयांच्या नोटांबद्दल महत्वाची माहिती देताना सांगितले की, चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या 50 % नोटा परत आल्या असून ज्याची किंमत तब्बल 1 कोटी 82 लाख कोटी रुपये आहे.

दोन हजार रुपयांच्या एकूण 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा वापरात होत्या. नोटा चलानतून बाद केल्याची घोषणा केल्यावर दोन हजार रुपयांच्या सुमारे 1.8 लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा झालेल्या आहेत. सध्या चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांपैकी हे अंदाजे 50 % आहे,” असेही ते म्हणाले आहेत

Similar Posts