पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज ! यंदा मान्सून काळात‘असं’होणार..

Punjab Dakh Monsoon News : भारतात एक ते दीड महिन्यात मान्सूनला सुरुवात होणार असून मान्सून देशात सर्वप्रथम केरळमध्ये आणि त्यानंतर इतर राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण उत्तर भारतात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने निश्चितच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी अमेरिकन हवामान विभागाने भारतासह संपूर्ण आशिया खंडात एल निनोच्या EL nino प्रभावामुळे यंदाच्या पावसाळ्यात पाऊस कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. भारतातील काही संस्थांनी अमेरिकेच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाला देखील दुजोरा दिला होता. स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या देशातील संस्थेने देखील यंदा भारतात मान्सून काळात कमी पाऊस राहण्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र, भारतीय हवामान विभागाने या संस्थेच्या अंदाजावर पाणी फिरले आहे.

दरम्यान मान्सून बद्दल राज्यातील ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील एक महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री गावात आयोजित एका शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी 2023 च्या मान्सून बाबत मोठी माहिती देताना सांगितले की, यंदा साल 2022 प्रमाणे चांगला व समाधानकारक मान्सून राहणार आहे. शिवाय यावर्षी मान्सूनचे आगमन 8 जूनला होईल आणि 22 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

या शिवाय 30 जून 2023 पर्यंत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खरीप पेरण्या पूर्ण होतील असे देखील त्यांनी सांगितले. पंजाबराव डख यांच्या मते, गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या मान्सून काळात अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. यावर्षी मराठवाड्यात विशेषत: जालना जिल्हा व परिसरात अधिक पाऊस होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तसेच पंजाबराव डख यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण लवकरच भरेल आणि दोनदा गेट उघडून पाणी चा सोडावे लागेल, असे देखील यावेळी सांगितले आहे. पुढे बोलतांना त्यांनी कृष्णाकाठी महापूर येण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपूर्वी वर्तवली आहे. निश्चितच कृष्णा नदीकाठी वसलेल्या शेतकऱ्यांना यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.

Similar Posts