उद्यापासून संभाजीनगरात पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या महाशिव पुराण कथेची सुरुवात..

???? छ. संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील श्री रामचंद्र मंदिर मठ, बालाजी ट्रस्ट मैदान, मार्केट यार्ड कमिटीच्या जवळ पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या महाशिव पुराण कथेला उद्या म्हणजेच दिनांक 1 जून 2023 पासून सुरुवात होत असून ही कथा 7 जून 2023 पर्यंत चालणार आहे..

छ. संभाजीनगरात होत असलेल्या श्री रामचंद्र मंदिर मठ, बालाजी ट्रस्ट मैदान मधील मोकळ्या जागेत शिवपुराण कथा वक्ते पंडित प्रदीपजी महाराज मिश्रा यांच्या शिवपुराण कथेच्या निमित्ताने कार्यकर्ते भव्य-दिव्य स्वरुपात कथेचे आयोजन करण्यात आले आहे..

छ. संभाजीनगर शहरातील विस्तीर्ण अशा मोकळ्या मैदानात राष्ट्रीय पातळीवरील शिवपुराणकथेचे आपल्या ओजस्वी वाणीतुन निरुपण करणारे पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांच्या वाणीतून शिवपुराण कथा ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असून या कथेसाठी भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे.. कथेसाठी बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था यावरही विशेष भर देण्यात आणि आहे. केवळ संभाजीनगर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा तसेच परराज्यातूनही भाविक शिवपुराण कथेचे श्रवण करण्यासाठी छ. संभाजीनगर शहरात येणार आहेत.

कथेचे ठिकाण : श्री रामचंद्र मंदिर मठ, बालाजी ट्रस्ट मैदान, मार्केट यार्ड कमिटीच्या बाजूला, पिसादेवी रोड, छ्त्रपती संभाजीनगर..

Google Location..????????
https://maps.app.goo.gl/Eg55JUxQuJQBoeaP6

Similar Posts