प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता एसटी बसचे थेट लोकेशन पाहता येणार – MSRTC Commuter App
MSRTC Commuter App – महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या ताफ्यातील बसेससाठी व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (VTS) लागू केली आहे. या आधुनिक सुविधेमुळे प्रवाशांना आता एसटी बसचे थेट लोकेशन, ती बस नेमकी कुठे आहे आणि बस स्टँडवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल याची अचूक माहिती मिळणार आहे.
कशी कार्य करते ही सेवा?
- “MSRTC Commuter App” या अधिकृत मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे ही सेवा वापरता येणार आहे.
- तुमच्या एसटी तिकीटावर दिलेला ट्रिप कोड ॲपमध्ये टाका.
- त्यानंतर तुम्हाला बसचे लाइव्ह लोकेशन, तिचा प्रवास मार्ग, आणि बसस्टँडवर पोहोचण्याचा अंदाज वेळ दिसेल.
- ॲपमधून तुम्ही जवळच्या बसस्टँडची माहिती, लांब पल्ल्याच्या बसेसचे वेळापत्रक आणि इतर आवश्यक माहिती मिळवू शकता.
लालपरीतून डिजिटल प्रवासाची नवी सुरुवात
ग्रामीण भागात लालपरी ही लोकांसाठी जीवनवाहिनीच आहे. मात्र, वेळापत्रक किंवा बसच्या वेळांची अचूक माहिती नसल्यामुळे प्रवाशांना अनेकदा बसची वाट पाहावी लागते. या समस्येचे निराकरण व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे होणार आहे.
- एसटीच्या 18,000 बसांवर व्हीएलटी उपकरणे बसवण्यात आली आहेत.
- बसचे लोकेशन 24×7 ॲपवर दिसेल.
- ही यंत्रणा मुंबई सेंट्रल येथील अत्याधुनिक नियंत्रण कक्षाद्वारे चालवली जाईल.
MSRTC Commuter App चे मुख्य फायदे
- अचूक वेळेची माहिती: बस कधी येणार आहे, याचा 24 तास आधी अंदाज येईल.
- वेळेची बचत: अनावश्यक वाट पाहण्याची गरज नाही.
- आधुनिक सुविधा: बसचे स्टॉप्स, मार्ग, वेळापत्रक, तिकीट बुकिंग यासारख्या सुविधाही ॲपद्वारे मिळतील.
- आनंदी आणि टेन्शन फ्री प्रवास: नियोजन आणि ट्रॅकिंगमुळे प्रवास अधिक सोयीचा आणि आरामदायक होईल.
“MSRTC Commuter App” चे फायदे
- live location tracking : बसचा रिअल-टाइम लोकेशन ट्रॅक करा.
- वेल-ऑर्गनाईज वेळापत्रक: लांब पल्ल्याच्या बसेसचे मार्ग आणि वेळापत्रक पाहता येईल.
- तिकीट बुकिंग: ॲपद्वारे ऑनलाईन तिकीट बुक करता येते.
- प्रवासाचा इतिहास: तुमच्या प्रवासाचा तपशील सहज पाहता येईल.
MSRTC Commuter App कसे डाउनलोड कराल?
तुम्ही हे ॲप Google Play Store किंवा iOS App Store किंवा थेट खालील लिंकवरून सुद्धा सहज डाऊनलोड करू शकता.
निष्कर्ष
एसटी महामंडळाची ही नवी डिजिटल सेवा प्रवाशांचा वेळ, ऊर्जा आणि अनावश्यक त्रास कमी करेल. लालपरीचा प्रवास आता अधिक नियोजित, सुरक्षित आणि आनंददायक होणार आहे. त्यामुळे, तुमच्या पुढच्या प्रवासासाठी MSRTC Commuter App डाउनलोड करा आणि या डिजिटल सुविधेचा लाभ घ्या!