Land Distribution Act | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! फक्त शंभर रुपयांत करता येते जमिनीची वाटणी, जाणून घ्या कशी?

जिथे भावकी येते तिथे भावा भावात आज ना उद्या जमिनीची वाटणी ही होतेच. वडिलोपार्जित जमिनीची वाटणी करत असताना बऱ्याच वेळा बरेचसे वादही निर्माण होतात. त्याचबरोबर जमिनीची वाटणी करत असताना भरमसाठ पैसेही खर्च होतात. त्यामुळेच या काही वेळेस जमिनीची वाटणी (Land Distribution Act) करणं देखील राहून जातं. मात्र, शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे माहित आहे का? आपण फक्त शंभर रुपयांमध्ये जमिनीची वाटणी करू शकतो. (Land Distribution Act) चला तर मग जाणून घ्या शंभर रुपयांत जमिनीची वाटणी कशी होते.. (Land Distribution Act)

शंभर रुपयांत जमिनीचे वाटणीपत्र
वडिलोपार्जित जमिनीची वाटणी करण्यासाठी वाटणीपत्र करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. (Land Distribution Act) या वाटणी पत्राविना जमिनीची वाटणी करणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नसते. बऱ्याच वेळा गावाचे तलाठी शेतकऱ्यांकडून जमिनीची वाटणी करताना पैसे उकळतात. परंतु शासनाच्या नियमानुसार तुम्ही फक्त शंभर रुपयांमध्ये जमिनीचे वाटणी पत्र तयार करू शकता.

कसे तयार करता शंभर रुपयांत वाटणीपत्र?
संविधानातील कलम 85 अन्वये वडिलोपार्जित जमिनीची वाटणीपत्र करण्यासाठी वाटणी पत्र हे 100 रुपयांमध्ये तयार केलं जातं. भाऊ-बंदकीच्या सहमतीने ही वाटणी पत्र तयार करणे काम आहे. भावा-भावाला शांतपणे जमिनीची वाटणी करायची असेल तर या 85 कलमाचा आधार घेऊन जास्त पैसे न खर्च करता यावर शंभर रुपयांमध्ये जमिनीची वाटणीपत्र तयार होते.

शेतकऱ्यांना होईल मोठा फायदा
मित्रांनो फक्त शंभर रुपये मुद्रांक शुल्क असलेल्या दस्तावर तुम्ही वाटणी पत्र तयार करून या कलमाचा लाभ घेऊन त्याप्रमाणे जमिनीची वाटणी केली तर शेतकऱ्यांना नक्कीच मोठा फायदा होईल व शेतकऱ्यांचे विनाकारण खर्च होणाऱ्या 5 ते 10 हजार रुपयांचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे

Similar Posts