Kusum Solar Pump MEDA : कुसुम महाऊर्जा योजनेतंर्गत वाढणार सोलार पंपांचा जिल्हानिहाय कोटा..!

Kusum Solar Pump MEDA Kusum Mahaurja : राज्य सरकारतर्फे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या महाऊर्जा कुसुम सोलार ही योजना राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून राज्यातील शेतकऱ्यांनी सौरऊर्जा योजनेचा लाभ घ्यावा असे सरकारने आवाहन केले आहे. या उद्देशानेच ही योजना सुरू करण्यात येत असल्याचे देखील सरकार ने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शेतीच्या सिंचनाकरता सौरपंप मिळणार असून हे सर्व सौर पंप शेतकऱ्यांना तब्बल 90% अनुदानावर मिळणार तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना या पंपांसाठी 95% अनुदान मिळेल. राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया करावी लागेल. नोदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच हे सौरपंप मिळणार आहे.

शेतकऱ्यांना कुसुम सौर योजनेंतर्गत तीन प्रकारचे (7.5, 5 आणि 3 HP) सिंचन पंप मिळतील. लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये वीज जोडणी केलेली नाही फक्त त्याच शेतकऱ्यानी या योजनेसाठी अर्ज करावा. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (MEDA) तुम्हाला तुमच्या शेतीच्या गरजांकरता सौर पंप लावण्याची संधी देत असून ही कंपनी तुम्हाला सौर पंपाबरोबरच शेतीसाठीच्या इतर आवश्यक गोष्टींचा पूर्ण संच सुद्धा प्रदान करेल. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या कुसुम योजनेअंतर्गत कार्यरत असून या प्रकल्पामध्ये सरकार डिझेल पंपाऐवजी अनुदानित सौर पंप बसवणार आहे.

या योजनेच्या अटी व शर्ती

  • कुसुम योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील शेतकरीच अर्ज करू शकतात.
  • ज्या शेतकऱ्यांच्या शेतात आधीच वीज जोडणी केलेली आहे ते या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  • जे शेतकरी या योजनेंतर्गत अर्ज करतील त्यांना या सौर पंपाचा वापर पिकांच्या सिंचनासाठी करने बंधनकारक आहे.
  • हे सौर पंप फक्त वैयक्तिक वापरासाठी वापरावेत.
  • शेतकऱ्यांकडे या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्व कागदपत्रे आणि बँक खाती असणे आवश्यक आहे.

कोणत्या जिल्ह्याला किती पंपाचा कोटा?

कोल्हापूर — १५८, रत्नागिरी-सिंधुदुर्ग-ठाणे-रायगड प्रत्येकी — १, वर्धा — २, सांगली — १ हजार ८२०, पालघर — ८, पुणे — २ हजार ६०२, सातारा — १ हजार — ३६९, सोलापूर — १ हजार ४५०, नागपूर — ३०, चंद्रपूर — २०, गडचिरोली — ५४, भंडारा — ४२०, गोंदिया — ९४, अमरावती — ६१, अकोला — २७२, बुलडाणा– ७३५, यवतमाळ — १ हजार १४०, वाशीम — ७७३, नाशिक — १ हजार ७६९, अहमदनगर — १ हजार ४१९, धुळे — १ हजार २३३, जळगाव — ८९६, नंदुरबार — १ हजार ३६, जालना — ९१९, परभणी — ७३१, हिंगोली — ९०७, लातूर — ८२६, नांदेड — ९५२, बीड — ६९६, धाराशिव — ५०० याप्रकारे जिल्हानिहाय अर्जांची संख्या Kusum Solar Pump या योजनेतंर्गत असून दिनांक २६ मे २०२३ पासून नवीन कोटा उपलब्ध झाला आहे. या योजनेतंतर्गत ऑनलाइन नोंदणीसाठी अर्जदाराकडे आधारकार्ड, बँक पासबुक, सातबारा, फोटो, सही अथवा अंगठा, जात-प्रमाणपत्र इ. कागदपत्रांची आवश्यकता आहे.

अशी आहे ही योजना

  1. कुसुम महाऊर्जा सौर लाभार्थी नोंदणी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेली ऑनलाइन प्रक्रिया आहे.
  2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदारांनी https://www.mahaurja.com या अधिकृत वेबसाइटवर कुसुम महाऊर्जा नोंदणी फॉर्म २०२३ भरणे गरजेचे आहे.
  3. पात्र शेतकर्‍यांना 95% अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिला जातो.
  4. शासनाचे प्रतिनिधी सौर पंप बसवण्याचे काम पूर्ण करण्यासाठी घटनास्थळी येतात, कारण हा कार्यक्रम महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत येतो.
  5. नोंदणी प्रक्रियेनंतर, संपूर्ण योजना महाराष्ट्र ऊर्जा विकास एजन्सी (MEDA) द्वारे प्रशासित केली जाईल.

Similar Posts