महाराष्ट्रात लवकरच होईल मान्सूनची एन्ट्री ? ढगांची लपाछपी सुरू, पंजाबराव डख यांची लेटेस्ट अपडेट जाणून घ्या…

महाराष्ट्रातील अनेक भागात सध्या उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. तर अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत राज्यातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि महाराष्ट्राचे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या मते, आज 24 मे आणि 1, 2, 3 जून रोजी राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता अधिक आहे. पंजाबराव डख म्हणाले की, 8 जून रोजी मुसळधार पावसासह महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल. राज्यात यंदा चांगला पाऊस होणार आहे.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपल्या ताज्या अंदाजात, हे सुद्ध म्हटले आहे की, पुढील 72 तासांत मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि रायगडमध्ये गडगडाट होण्याची शक्यता आहे.

24 मे रोजी मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद येथील अनेक भागात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. तर विदर्भात २७ मेपर्यंत हवामान कोरडे राहणार असून पावसाची शक्यता नाही. यादरम्यान विदर्भात पारा ४० ते ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. यापूर्वी विदर्भातील बहुतांश जिल्हे आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता.

मान्सून आता कुठे पोहोचला आहे?
दरम्यान, नैऋत्य मान्सूनने अंदमान आणि निकोबारमध्ये लवकर प्रगती केली आहे आणि स्थिर प्रगती करत आहे. IMD ने आज (23 मे) असा अंदाज वर्तवला आहे की, पुढील दोन दिवसांत बंगालच्या उपसागराचे आणखी काही भाग, अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह (अंदमान आणि निकोबार बेटे) पश्चिम मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल आहेत. साधारणपणे नैऋत्य मान्सून 22 मे रोजी अंदमानात दाखल होतो. मात्र यंदा मान्सून तीन दिवस आधीच अंदमानात पोहोचला. अंदमानमध्ये शुक्रवारी मान्सूनने दणका दिला. बंगालच्या उपसागरात शनिवारी मान्सूनने विराजमान होण्यास सुरुवात केली. बंगालचा उपसागर पूर्णपणे ओलांडण्यासाठी मान्सूनला आठ दिवस लागू शकतात, त्यानंतर ते कर्नाटकच्या दिशेने पोहोचण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी येणार?
यावर्षी मान्सूनचा पाऊस केरळमध्ये होण्यास तीन दिवस उशीर होण्याची दात शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून मान्सूनच्या पुढील वाटचालीकरिता वातावरण अनुकूल राहिल्यास १ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यामुळे महाराष्ट्रात ८ जूनपूर्वी आणि मुंबईत ११ जूनपूर्वी मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

Similar Posts