|

लहान मुलांना एसी किंवा कुलरमध्ये झोपवताना चुकूनही या 5 चुका करू नका, पश्चाताप करावा लागेल

पावसाळा सुरू झालेला असूनसुद्धा उन्हाची तीव्रता काही कमी होण्याची नाव घेत नाहीये, अशा परिस्थितीत जर तुमच्या नवजात बाळाचा पहिला उन्हाळा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल.

लहान मुलांना प्रौढांपेक्षा जास्त गरम वाटते. अशा परिस्थितीत नवजात बाळाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी तुम्ही त्याला एसी किंवा कुलरमध्ये झोपवत असाल तर चुकूनही या चुका करू नका. चला जाणून घेऊया, मुलांना कूलर किंवा एसीमध्ये झोपवताना कोणत्या 5 चुका टाळल्या पाहिजेत.

खोलीच्या तापमानाची काळजी घ्या

बाळाला पहिल्यांदा एसीमध्ये झोपवताना एसीचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे. लक्षात ठेवा, ज्या खोलीत नवजात झोपले आहे त्या खोलीचे तापमान खूप थंड नसावे.

बाळाला कोणते कपडे घालावायचे

जर तुमचे बाळाचे वय एक महिन्यापेक्षा कमी असेल तर त्याला ए.सी. मध्ये झोपवण्याआधी चांगले झाकून ठेवा. बाळाला पातळ स्वेटर व डोक्यावर टोपी आणि हाता पायात मोजे घाला. परंतु जर का तुमच्या बाळाचे वय एका महिन्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इतके झाकण्याची आवश्यकता नाही.

एसी बंद-चालू करत रहा

मुलाला एसी रूममधून दुसऱ्या खोलीत हलवताना, लगेच असे करू नका याची विशेष काळजी घ्या. हे करण्यापूर्वी, एसी बंद करा आणि मुलाचे शरीर खोलीच्या तापमानावर येऊ द्या. त्यानंतरच त्याला एसी रूममधून बाहेर काढा. मुलाला सतत एसीमध्ये ठेवू नका, एसी मध्येच बंद करत रहा. मुलाला जास्त वेळ थंड तापमानात ठेवल्याने त्याच्या शरीराचे तापमान कमी होण्याचा धोका असतो, ज्यामुळे त्याची तब्येत बिघडू शकते.

एसीची हवा थेट लागू देऊ नका.

मुलाला एसीमध्ये झोपवताना त्याला एसीची थेट हवा लागणार नाही याची विशेष काळजी घ्या. जेव्हा थेट एसी किंवा कूलारची हवा बाळाला लागते तेव्हा त्याला ताप किंवा सर्दी होण्याची शक्यता जास्त असतो. बाळाला एसीमध्ये झोपवताना त्यावर हलकीशी चादर घाला. तुमच्या बाळाला थंडीपासून वाचवण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला भारी ब्लँकेट किंवा रजाई घाला. लक्षात ठेवा की मुलाला तुमच्यापेक्षा फक्त एक थर जास्त हवा आहे.

डॉक्टरांचे सल्ला घ्या

जर तुमचे बाळ प्री-मॅच्युअर असेल, तर त्याला एसी किंवा कूलरमध्ये झोपवण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच, प्री-मॅच्युअर बाळाला कूलर किंवा एसीमध्ये झोपवण्यापूर्वी, त्याच्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावा जेणेकरून त्याची त्वचा कोरडी न होता मऊ राहील.

Similar Posts