पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करा फक्त ११०० रु. मध्ये, ही आहे एसटीची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ही राज्य-मालकीची बस सेवा आहे. MSRTC प्रवाशांच्या फायद्याकरिता अनेकदा वेगवेगळ्या प्रवासाच्या योजना आणि उपक्रम सादर करत असतात.

म्हणून MSRTC ने खास आपल्या प्रवाशांसाठी ‘आवडेल तेथे प्रवास’ नावाची योजना सुरू केली असून या योजनेची सुरुवात सन 1988 पासून झाली आहे. प्रवाशांबरोबर स्नेह आणि मैत्रीपूर्ण नाते निर्माण व्हावे आणि त्यांना कमी खर्चात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जसे की, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळांना भेट देता यावी यासाठी त्यांनी प्रवाशांसाठी आवडेल तेथे प्रवास हि योजना सुरू केली आहे.

शासन देत आहे फुकटचे 50 हजार रुपये; जाणून घ्या कोणाला मिळणार याचा फायदा..

‘आवडेल तेथे प्रवास’या योजनेमध्ये चार दिवसाचा पास दिला जातो. खाजगी ट्रॅव्हलिंग कंपनीच्या सोयी सुविधा आणि विविध ट्रॅव्हलिंगसोबत स्पर्धा असताना सुद्धा नागरिक आवडेल तेथे प्रवास ह्या योजनेला चांगलाच प्रतिसाद देत आहे.

आवडेल तेथे प्रवास योजनेअंतर्गत चार दिवसांच्या पासकरिता वर्षातून 2 फेरी म्हणजेच 2 हंगाम निश्चित करण्यात आले असून यात 15 ऑक्टोबर ते 14 जून हा गर्दीचा हंगाम तर 15 जून ते 14 ऑक्टोबर हा कमी गर्दीचा हंगाम असल्याचे सुचित केले गेले आहे. या कारणामुळे दोन्ही हंगाम मधील किंमती मध्ये पण थोडी तफावत असेल असे MSRTC तर्फे सूचित करण्यात आले.

शासन देत आहे फुकटचे 50 हजार रुपये; जाणून घ्या कोणला मिळणार याचा फायदा..


या योजनेत सरकारी महामंडळाच्या ज्या गाड्या जसे शिवनेरी, शिवशाही, हिरकणी, लाल डब्बा बस ची निवड केली जाते. प्रवाशी राज्यात चार दिवस कोठेही आणि कितीही फिरू शकतात. चार दिवसांच्या लाल एसटी पासची किंमत प्रतिप्रवाशी 965 रुपये, निमआरामसाठी प्रतीप्रवाशी 1150 तर शिवशाहीसाठी प्रतीप्रवाशी 1205 रुपये आहे. या योजनेअंतर्गत नागरिक राज्यातील धार्मिक स्थळे जसे तुळजापूर, अक्कलकोट, गणपतीमुळे त्याचबरोबर लग्न सराई प्रसंगी सुद्धा या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणावर घेतात.

या योजनेच्या नियम व अटी

शासन देत आहे फुकटचे 50 हजार रुपये; जाणून घ्या कोणाला मिळणार याचा फायदा..

  • ज्या नागरिकांकडे आवडेल तेथे प्रवास हा पास असेल आणि तो प्रवास करत असेल तर अश्या नागरिकांना ते पासधारक आहेत म्हणून प्रवेश त्यांचा नाकारू नये.
  • जे प्रवाशी पास धारक आहेत आणि ते आवडत्या सीटसाठी हक्क सांगत असेल तर ते या पासचा गैरवापर असल्याचे मानले जाईल.
  • पास गहाळ झाल्यास कोणत्याही परिस्थितीत दुसरा पास देण्यात येणार नाही, म्हणजेच तुमचा पास सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी हि प्रवाशांची राहील.
  • जर कोणी प्रवाशी या पासचा गैरफायदा घेत असेल तर त्याचा पास हा जप्त केला जाईल.
  • प्रवास कर असताना प्रवश्याची कोणतीही मौल्यवान वस्तू गहाळ झाली तर त्याकरिता एसटी महामंडळ जबाबदार राहणार नाही.
  • आवडेल तेथे प्रवास या योजनेअंतर्गत पासची वैधता संपली असेल आणि तरीही तो प्रवशी प्रवास करत असेल तर त्याच्याकडून संपूर्ण तिकीट आकारलं जाईल.
  • सदरचा पास ज्यांना जारी झाला आहे त्यांनाच प्रवास करता येईल म्हणजेच हा पास अहस्तांतरणीय राहील.
  • आवडेल तेथे प्रवास या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना ००:०० ते २४:०० या वेळेप्रमाणे करण्यात येईल.
  • पासाच्या मुदतीच्या अंतिम दिवशी प्रवासी २४.०० वाजेनंतर प्रवास करत असेल तर त्याला पुढील प्रवासाकरिता तिकीट घेणे बंधनकारक राहील.
  • काही कारणामुळे बस उशिरा सुटल्यामुळे, किंवा रस्त्यात बसमध्ये बिघाड झाल्यामुळे किंवा इतर काही अपरिहार्य कारणामुळे बस नियोजित पोहचण्याची वेळ २४.०० पूवी होती ती २४.०० नंतर पोहचत असल्यास आणि पास धारकाचा प्रवास खंडित झाला नसल्यास त्या पासधारकांकडून वेगळ्या तिकिटाचे पैसे वसूल करू नये.
  • कर्मचारी संपमुळे एस टी बसची वाहतूक बंद झाल्यास नागरिक या पासावर प्रवास न करू शकल्यास त्यांना प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा किंवा मुदतवाढ देण्यात येणार असून हा परतावा किंवा मुदतवाढ वाहतूक नियमित सुरु झाल्यापासून ३ महिने पर्यंतच्या कालावधीसाठी देण्यात येईल.

शासन देत आहे फुकटचे 50 हजार रुपये; जाणून घ्या कोणाला मिळणार याचा फायदा..

Similar Posts