जन्म-मृत्यू अन् लग्नाचा दाखला 1 ते 21 दिवसांत मिळणार; विवाहाची नोंद नसेल तर इथे अर्ज करा – Birth, Death and marriage Certificate

Birth, Death and marriage Certificate – जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणीसाठी आता महापालिकेकडून अधिक पारदर्शक आणि गतिमान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेद्वारे नागरिकांना वेळेत आवश्यक प्रमाणपत्र मिळणे सुलभ झाले आहे. योग्य माहिती आणि कागदपत्रांसह अर्ज केल्यास, अनेकदा केवळ 1-2 दिवसांतही प्रमाणपत्र मिळू शकते.

जन्म प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया आणि नियम:

नवजात शिशूचा जन्म सरकारी किंवा खासगी रुग्णालयात झाल्यास, त्या रुग्णालयाकडून ऑनलाइन नोंदणीसाठी अर्ज महापालिकेकडे पाठवला जातो. या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यावर २१ दिवसांत जन्म प्रमाणपत्र नागरिकांच्या ताब्यात दिले जाते.

यासंबधीत असलेले महत्त्वाचे नियम:

  • नवजात बाळाचे नाव:
    • प्रमाणपत्रावर नवजात शिशूचे नाव एका वर्षाच्या आत नोंदवले जाऊ शकते.
    • नोंदवलेल्या नावासह प्रमाणपत्राचे वितरण होते
  • घरी जन्म झाल्यास:
    • जर शिशूचा जन्म घरी झाला असेल, तर जन्म नोंदणीसाठी नजिकच्या आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी व वैद्यकीय तपासणी अहवाल आवश्यक असतो. 
    • त्यासोबत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नोंदणी विभागात अर्ज करावा लागतो.

Birth certificate अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • माता-पित्याचे आधार कार्ड
  • रुग्णालयाचा डिस्चार्ज स्लिप किंवा डॉक्टरचा अहवाल
  • पत्ता पुरावा (वीज बील, रेशनकार्ड इत्यादी)
  • नवजात बालकाला नावे प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज

जन्माची नोंद नसल्यास काय करावे?

  • १९२७ पूर्वीच्या नोंदी महापालिकेकडे उपलब्ध नाहीत.
  • अशा परिस्थितीत, १३(३) अंतर्गत तहसीलदारांकडे अर्ज करणे बंधनकारक आहे.
  • १०-अ (रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचा दाखला) व १०-ब (सीआरएस पोर्टलवर नोंद नसल्याचे प्रमाणपत्र) महापालिकेकडून घेऊन तहसीलदारांना अर्ज सादर करावा लागतो.
  • तहसीलदार तपासणी करून आवश्यक आदेश देतात, त्यानंतर महापालिकेकडून प्रमाणपत्र वितरित केले जाते.

मृत्यू प्रमाणपत्र (death certificate)साठी प्रक्रिया:

मृत्यू रुग्णालयात किंवा घरी झाला असल्यास, मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रक्रिया वेगळी असते.

  • रुग्णालयात मृत्यू झाल्यास:
    • रुग्णालयात मृत्यू झाल्यास, संबंधित रुग्णालय अर्जासोबत मृत्यूचा वैद्यकीय अहवाल महापालिकेकडे पाठवते.
    • अर्जाची पडताळणी करून २१ दिवसांत मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते.
  • घरी मृत्यू झाल्यास:
    • घरी मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत मृत्यूचे कारण तपासणे कठीण असते, अशावेळी, स्थानिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व कर्मचारी मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी तपासणी करतात.
    • तयार करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे मृत्यू प्रमाणपत्र जारी केले जाते.

Death certificateसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • मृत व्यक्तीचे आधार कार्ड
  • कुटुंबीयांचा ओळखपुरावा
  • वैद्यकीय अहवाल (जर उपलब्ध असेल तर) 

विवाह नोंदणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे:

लग्नानंतर ९० दिवसांत नोंदणी करणे बंधनकारक आहे. ही नोंदणी वेळेत न केल्यास आर्थिक दंडाचा सामना करावा लागू शकतो. 

अर्ज शुल्क:

  • विवाह नोंदणीसाठी केवळ ६५ रुपये शुल्क आहे.
  • ९० दिवसांच्या आत नोंदणी न झाल्यास, अतिरिक्त ७०० रुपये दंड भरावा लागतो (एकूण ७६५ रुपये)

Marriage certificateसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

  • पती-पत्नीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड
  • जन्मतारीख व ओळखीचा पुरावा (जसे शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट इत्यादी)
  • दोघांचा पत्याचा पुरावा
  • तीन साक्षीदारांचे आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र
  • विवाह लावणाऱ्या पंडितांचा फोटो, त्याचे आधार कार्ड व स्वाक्षरी

Marriage certificate साठी नोंदणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे:

  • ऑनलाइन अर्ज भरून महापालिकेकडे सादर केल्यानंतर, नोंदणीसाठी एक ठरावीक दिवस दिला जातो.
  • त्या दिवशी पती-पत्नी व साक्षीदार महापालिकेच्या कार्यालयात उपस्थित राहतात.
  • सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर २१ दिवसांत विवाह प्रमाणपत्र जारी केले जाते.

महत्त्वाचे

  • अर्जामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी असल्यास, अर्जदाराला वेळेत कळवले जाते.
  • अर्ज पूर्ण असल्यास, तातडीच्या परिस्थितीत १-२ दिवसांत प्रमाणपत्र मिळण्याचीही सोय आहे.
  • विवाह, जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्राची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेवर करण्यात आली आहे.

काही महत्त्वाच्या बाबी

  • Birth, Death and marriage Certificate करिता अर्ज करण्याआधी सर्व कागदपत्रांची पूर्णपणे खात्री करून घ्यावी.
  • प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.
  • कोणत्याही अडचणीसाठी संबंधित विभागाचे सहाय्य उपलब्ध आहे.

सारांश:

महानगरपालिके मधील सुधारित प्रक्रिया ही नागरिकांना वेळेवर आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देते. त्याकरिता नागरिकांनी वेळेत अर्ज सादर करून या प्रक्रियेचा लाभ घेऊन होणाऱ्या अडचणी टाळाव्यात. Birth, Death and marriage Certificate

Similar Posts