भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; केव्हा आणि कुठे होणार सामने? जाणून घ्या..
ICC Men’s CWC 2023 | 100 Days to Go, ODI World Cup 2023 Full Schedule: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक या वर्षी भारतात आयोजित केला जाईल, ज्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे, जेव्हा संपूर्ण विश्वचषक भारतात खेळवला जाईल. यापूर्वी, भारताने संयुक्तपणे 1987, 1996 आणि 2011 एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकांचे आयोजन केले होते. 13व्या एकदिवसीय विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक मंगळवारी मुंबईत प्रसिद्ध झाले.
ही पूर्ण स्पर्धा ४६ दिवसांची राहणार असून ५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंडचा संघ आणि गतवर्षीचा उपविजेता न्यूझीलंडचा संघ या दोघांच्या सामन्याने विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार असून भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. तर वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.
मुंबई आणि कोलकाता येथे होणार उपांत्य फेरीचे सामने.

विश्वचषकादरम्यान, 10 संघ राऊंड रॉबिन लीगमध्ये एकमेकांसमोर येतील, ज्यात 45 सामने होतील. प्रत्येक संघ इतर 9 संघांशी राऊंड-रॉबिन स्वरूपात खेळेल, अव्वल चार संघ बाद फेरीसाठी (उपांत्य फेरी) पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. जर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा उपांत्य सामना मुंबईत होईल. वानखेडे स्टेडियमवर 2011 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 28 वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी श्रीलंकेचा पराभव केला होता. तसे, 1987 च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील विजेतेपदाचा सामना ईडन गार्डन्सने आयोजित केला होता जो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.
येथे पहा भारतीय संघाचे पूर्ण वेळापत्रक
- 8 ऑक्टोबर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – चेन्नई
- 11 ऑक्टोबर, भारत विरुद्ध अफगाणिस्तान – दिल्ली
- 15 ऑक्टोबर, भारत विरुद्ध पाकिस्तान – अहमदाबाद
- 19 ऑक्टोबर, भारत विरुद्ध बांगलादेश – पुणे
- 22 ऑक्टोबर, भारत विरुद्ध न्यूझीलंड – धर्मशाला
- 29 ऑक्टोबर, भारत विरुद्ध इंग्लंड – लखनौ
- 2 नोव्हेंबर, भारत विरुद्ध क्वालिफायर – मुंबई
- 5 नोव्हेंबर, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – कोलकाता
- 11 नोव्हेंबर, भारत विरुद्ध क्वालिफायर – बेंगळुरू
- 15 नोव्हेंबर – पहिली उपांत्य फेरी, मुंबई
- 16 नवंबर – दुसरी उपांत्य फेरी, कोलकाता
- 19 नवंबर – फायनल, अहमदाबाद
- घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स, RTO चे हेलपाटे मारण्याची गरज नाही – How To Apply Driving Licence Online
- व्यवसायासाठी सरकार देणार ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज, जाणून घ्या सरकारच्या मुद्रा लोन योजनेबद्दल – HDFC Kishor Mudra Loan 2025
- एसटी बसचं लोकेशन आता मोबाईलवर पाहा! प्रवाशांसाठी महामंडळाची नवी डिजिटल सुविधा – MSRTC Vehicle Tracking System
- खराब CIBIL स्कोअरवर असल्यावर सुद्धा हे सरकारमान्य Low Cibil Score Loan App देतील तुम्ही मागाल तेवढे कर्ज!
- लाडक्या भावांना घरबसल्या मिळणार 25 हजार रुपयांचे कर्ज; जाणून घ्या Low CIBIL Score 500-600 App बद्दल